२६ नोव्हेंबर , २००८ च्या घटनेनंतर लिहिलेली कविता :
एका वर्षात पाहीलेले दोन पोलिसी चेहरे --------- १७ जानेवारी , २००८ पासून आलेला स्थानिक पोलिसांचा स्वानुभव
२६ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर , २००८ ला आलेला मुंबई पोलिसांचा अनुभव
एका वर्षात पाहिलेले दोन पोलिसी चेहरे
एक चेहरा होता काळवंडलेला तर दुसरा हौतात्म्याने उजळलेला एक चेहरा होता गुलामगिरीचा
तर दुसरा निधड्या छातीचा
एक चेहरा होता विश्वासघाताचा
तर दुसरा होता ‘ सदरक्षणाय खलनिग्रणाय ’ चा
एक चेहरा होता अविश्वासाचा
तर दुसरा होता विश्वासाचा
एक चेहरा होता सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारला म्हणून त्यांना आरोपी बनवणा-यांचा
तर दुसरा होता सामान्य नागरिकांसाठी पोलीसी गणवेशाची शान ठेवत लढणा-यांचा
एक चेहरा होता निर्लज्जपणाचा
तर दुसरा होता शौर्याचा
एक चेहरा होता कर्तव्याची जाण नसलेल्यांचा
तर दुसरा होता लढताना शौर्यमरण आलेल्यांचा
एक चेहरा होता सत्याचा गळा घोटणा-यांचा
तर दुसरा होता असत्याचा बीमोड करणा-यांचा .
नागरिकांना हवा आहे पोलीस
कर्तव्याची जाण असलेला नागरिकांना हवा आहे पोलिस
शपथेची आठवण असलेला .
__________________________________________________________________
-नयना गोपाळ तारीकर
घाटकोपर , मुंबई .