सारे जग जेव्हा निशेमधे
बुडून सुखनिद्रेत होते
पशु पक्षी झाडेही
स्तब्ध उभी होती
तेव्हा तू निघालास
हातात तेवणारी मन्द चान्दणी घेउन
किर्र काळोख रातकीड्यान्ची कुजबूज
सोबतीला फक्त पायाखाली
कुरकुरणारा पाचोळा
निघालास तू वेड्या आशेने
रात्रीनन्तर उजेड येतोच या भ्रमाने
चालतोस चालतोस पण.........
पण प्रकाशाची तिरीपही नाही
एकाकी तुझ्या साथीला
अन्धाराशिवाय काहिही नाही
अरे वेड्या
कितीही चाल,
सूर्यतेज झळाळणारच नाही
सूर्याला सुद्धा महितीये रे
ग्रहणापुढे आपल काही चालत नाही
unknown