रडत होती माय, हंबरत होती गाय,
कर्जात होतं घर नि घरामागच शेत,
आभाळात नव्हत इतकं डोळ्यात होतं पाणी,
दारात बसली बहिण लग्नाच्य वयात येत,
आणि समोर पडलं होतं बापाचं प्रेत.
सांत्वनाचा सारा गोंगाट झाला दूर,
देणेकरयांचा थाट समोरून होता येत.
जाळायला त्याला कोणी देऊ केले पैसे,
तरी जाताना उरल्या जमिनीची कागदे होता नेत.
आणि समोर पडलं होतं बापाचं प्रेत.
सारया जाचातून सुटला होता तो आज,
सापडला होता मार्ग या स्वार्थाच्या जत्रेत,
व्यावहारिक जीवनात व्यवहाराच राहतो शाश्वत,
नश्वर जीवाचं एक ना एक दिवस नक्की होतं मैत.
आणि समोर पडलं होतं बापाचं प्रेत.
.................अमोल