देव देव करून ज्याला आम्ही पुजल
अश्रूंच्या पुरात त्याचाच घर भीजल
राम, रहीम, येशू कोठून आले असेल
माणूस म्हणून माणूस मात्र कोणी कुणाचा नसे
तीनशे साठ दिवसही त्यानेच का दिले वाटून
दिवाळी अन ईदिचा आनंद सगळ्यांनाच यावा दाटून
यांनी ठेवावी दाढी अन त्यांनी करावी मुंज
त्याने दिलेल्या ठेवीसाठी आमची सतत झुंज
एक प्राणी शकून आणि दुसरा ठरवावा अपशकून
दोन्हीही अंश त्याचेच त्यांनाच टाकल तोडून
प्राण्यांपासून पक्ष्यापर्यंत आम्ही केली वाटणी
मायभूचा विसर पडला तिचीही केली फडणी
पीर आणि फकीर, साधू आणि संत
धर्माच्या पुढार्यातच सतत आहे द्वंद
जागा हि आमची त्यांनी कशी घेतली
परमात्म्याच जग सार, हि गोष्ट नाही पटली
तो फक्त त्यांचा, ज्यांचा देवनावाने होतो फायदा
मेंढरा सारखी जो मानस फिरवतो चालून आपल कायदा
देव मुर्तीमद्धे आणि दाराग्यात जर असते
निराकार निर्विकार असण्यात सारच कुठे उरते
देव कुठेच नाही आहे तो तुझ्यात
सांगणारे सांगून गेले शिरलं नाही डोक्यात
तोही म्हणत असेल माझे मुल आपसात का भांडतात
माझाच रक्त माझ्यासाठी उगाच का सांडतात...
माझाच रक्त माझ्यासाठी उगाच का सांडतात......
.....दिनेश......