Author Topic: पुन्हा जगणे नाही  (Read 379 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,358
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
पुन्हा जगणे नाही
« on: August 26, 2019, 12:06:18 PM »
पुन्हा जगणे नाही

वाट चालत रहाते, कुठे थांबणे नाही
वाटेत जगण्याच्या, मागे वळणे नाही

एकांत गूढ स्थळी, शोध तो स्वतःचा
सहज साध्य एवढे, कधी जमणे नाही

कसला अट्टाहास, सुखा शोधण्याचा
दु:खाची याचना, सहज मागणे नाही

भोवताली ठार, चक्राकार सुख दु:ख
फेऱ्यातून माघारी, योग्य पळणे नाही

भासती खुप सोपे, रम्य मरण सोहळे
जाता मरण पंथा, पुन्हा जगणे नाही

© शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क:९५४५९७६५८९
« Last Edit: August 26, 2019, 01:33:44 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
तेरा अधिक दोन किती? (answer in English number):