Author Topic: लग्नाची भेटवस्तू  (Read 1972 times)

Offline vaishali2112

  • Newbie
  • *
  • Posts: 29
  • Gender: Female
लग्नाची भेटवस्तू
« on: March 13, 2010, 01:12:58 AM »
आनंदाचे हे क्षण घेउनी,
भरते ओंझळ सजलेली !
आहेर करते सोन पावलांचा
दारी तुझ्या नटलेली !

मनस्वी ही नाजूक परी,
नांदो सुखाने तुमच्या घरी !
आहेर करते सुखद क्षणांचा
आहे जबाबदारी तुझ्यावरी !

नव्या बंधनाची बांधुनी गाठ,
चालुनी येई ती तुझीच वाट !
आहेर करते सात जन्मांचा
तुमच्या संसारासाठी फिरवुनी पाठ !

राहिले अजून काही माझ्यापाशी,
भरते ओटी तिच्याच कुशी !
आहेर करते अर्धांगिनीचा
मनात कोरूनी तुझ्याचपाशी !

उरले काही माझ्याकडून,
स्वप्न तुमचे सावरायचे !
आहेर करते हा जीवतोडून
असेच हे नाते आवरायचे !

सर्वे काही देऊनी तुला,
रिकामी करते ओंझळ माझी !
तुझीच नवरी, माझ्याकडून
"भेटवस्तू" तुझ्या लग्नाची !

वैशाली......
[/b]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 650
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Re: लग्नाची भेटवस्तू
« Reply #1 on: March 13, 2010, 06:21:02 PM »
kya baat hai!! mast

Offline gaurig

  • Full Member
  • ***
  • Posts: 983
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: लग्नाची भेटवस्तू
« Reply #2 on: March 18, 2010, 12:44:28 PM »
wahh......, khupach chan........ :)
 
नव्या बंधनाची बांधुनी गाठ,
चालुनी येई ती तुझीच वाट !
आहेर करते सात जन्मांचा
तुमच्या संसारासाठी फिरवुनी पाठ !
 
उरले काही माझ्याकडून,
स्वप्न तुमचे सावरायचे !
आहेर करते हा जीवतोडून
असेच हे नाते आवरायचे !
too good......keep it up Vaishali

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):