असच एकदा चित्र प्रेमाचं
घेतलं होत काढायला
मनात बांधणी पक्की
पण नशीब नव्हते साथ द्यायला
प्रेमात पडलेलं मन
नेहमीच स्वप्नांच्या दुनियेत असत
गुलाबी स्वप्न रंगवीत
त्याला वास्तवाचे भान नसतं
तिच्यावर अफाट प्रेम करणं
तिच्यासाठी रात्रंदिवस झुरण
तिची एक झलक मिळवण्यासाठी धडपडण
असतो मनाचा खेळ सारा
तरीही मन धावत असतं
वेड्यासारखं त्या मृगजळामागे
कदाचित ती सुद्धा प्रेम करत असेल
फक्त या एका आशेवरती
हे असे का घडत प्रेमात
सगळे रंग उडून जातात क्षणात
पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी
आणि त्या बरोबर विस्कटत ते मन
.........प्रसाद
