२३/३/१० च्या Times of India चे मुखपृष्ठ वाचले आणि केवळ १२ वर्षाच्या मुलीवर आलेला भीषण प्रसंग वाचून पायाखालची जमीनच सरकली. ती बातमी वाचली व मस्तक बधीर झाले. वाटले:
करपून गेली माणुसकी, चूड लागली नात्यांना
नाही थरथरणार हात माझे, दगडांनी यांना ठेचताना
लाज, शरम, अब्रू, इज्जत, अर्थ नुरला शब्दांना
कोळून प्याले सगळे मिळून, एक कळी खुडताना
हात, पाय, लिंग यांची, कापून काढा यांना
कितीही शिक्षा दिल्या तरी, जखम अशी भरणार ना

हात जोडतो तुमच्यापुढे, ऊठ रे समाजमना
पिल्लांचे छत्र कायम ठेवा, हीच विनंती आई-बाबांना
- एक विदीर्ण मन