जगण्याचा या मज अर्थ कळेना
रस्त्याचा या मज शेवट दिसेना,
स्वर्थाचा जणू कळस असे इथे
दुसर्या खेचून पाऊल पडे पूढे,
कुठेच बघ हा रस्ता संपेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
नोकरीसाठी शिक्षण असे हे
पैशासाठीच असे ही नोकरी,
समाधान मात्र कुठेच मिळेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
यंत्रागत राबणारा मनुष्य हा
व्यवहाराच्या गर्तेत अडकलेला,
प्रेमाचा इथे लवलेश दिसेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
दु:खात ना कुणी साथी ना सोबती
सुखात मात्र सारे अवती-भवती,
कुणापास बोलावे काही उमजेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
असे कसे रे जगलो इथवर
पुढे कसे कसे रे जगणार
उत्तर कुठेही बघ हे मिळेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
श्वेता देव