नोकरी
मालक पोरास लावला शिक्षणाचा रस्ता
पोटास खाल्या जालाम्भर खस्ता
नवरा गेला तरी जपला मी वंशाचा दिवा
मालक पोरस तेवढ नोकरी लावा
मालक, पोराचा बा राबला तुमच्या हित फार
म्या पण विसरणार नाही तुमचे उपकार
शेताचा तुकडा तुमच्या हित गहाण ठिवा
मालक, पोरस तेवढ नोकरी लावा
मालक, पोरानिबी दरसाल नंबर काढला
समद्या गावास ठाव म्या कसा वाढविली
पोरग होईल अफिसर तवा बर वाटण जीवा
मालक, पोरस तेवढ नोकरी लावा
मालक लय वर पर्यंत तुमची ओळख हाय
म्या अंगठ्यावली पोर अनोळखी हाय
तुमच्या हातान कुठी बी चिकटून ठिवा
मालक, पोरस तेवढ नोकरी लावा.
अनाभीद्या बाल्माताकालीकार
शेगाव