छिन्न विच्छिन्न चित्त माझे
मनाशीच मी बोलतो
साठवणीचे बोल माझे
गुज माझे स्वतःशी खोलतो
दिवसही मज रात्र भासे
गर्दी अशी एकांतापारी
भीतीचे सावट ढगापरी
माझ्यावरी मी झेलतो
ना सांगतो, ना ऐकतो
माझ्यात मी गुंतलो
ध्येय माझे माझ्या परीचे
अंतरीच मी जगवितो
हा कुणाचा, असेल माझा
प्रश्न का पडती मला?
सतत, प्रत्येक क्षणाला
रहस्य मी उलगडतो
वाळू परी नाते निसटती
हातून माझ्या नेहमी
का नेमके ऐसे असावे?
मी स्वतःला प्रश्नितो
जानुनी घ्यावे कधीतरी
मलाच मी माझे स्वतःला
तक्रार कसली कुणाशी
जर माझ्याशीच मी झगडतो....
माझ्याशीच मी झगडतो.....
... दिनेश ......