बेकारी.....
जीवनाच्या धडपडीत, नशिबाची चढती उधारी
मिळत नहीं कामे, वाढत चालली बेकारी.....
वाढत्या बेकारी मुळे, भरत नाही पोट
पोटाची खळगी भरण्यास, लागतो अन्नाचा घोट
इथे अन्न मीळवण्यास, कमवावी लगते नोट
बेकारी पाठी लागताच, धावून येते उपास मारी.....
कुणी खून करत, तर कुणी चोरी
आज घर चालवण्यास, करावी लगते हायमारी
कामधंदा मिळत नाही, ओकारी आल्यावर नसते सुपारी
मग वाईट मार्गास नेते, आपणास पुढे बेकारी.....
बंद होतात कंपन्या, मिळत नहीं काम
पैश्यावाल्यांची दुनियासारी, गरीब झालाय गुलाम
नोकरी गेली सुटून, बेकारी वाढली जाम
बेकारिच्या आशा दुनियेत, हातून घडते उसनेवारी.....
अंधाराच्या वाटेत, जीवनात शिरते बेकारी
मनुष्य होतो हतबल, छिनली जाते भाजी भाकरी
मन जागते आशेवर, देवतारी त्याला कोण मारी
या म्हणीवर जगतात सरे, सहन करून बेकारी.....
कमलेश गुंजाळ
9619959874