तळहातांच्या जखमांना
मलम कसे मी लावू
आठवणींच्या झुल्यांचे
झोके कसे मी थांबवू ….
प्रेमाची कुठे पंढरी
कुठे प्रेमाचे वारकरी
माझ्या प्रेमाच्या विठुरायाला
कोण्या मंदिरी मी पाहू…
ऊन्हातान्हाची पर्वा आता
ह्या वाटेवरती कसली
तुझेच नाम:स्मरण राही
अशी ना भक्ती दिसली
मनाच्या कोऱ्या पानांवरचे
ते नाव कसे मी मिटवू…….
तळहातांच्या जखमांना
मलम कसे मी लावू
आठवणींच्या झुल्यांचे
झोके कसे मी थांबवू…..
कवी:- सतिश चौधरी ...