पर्याय नाही............पर्याय नाही............
जगणं म्हणजे फसवणूक, पण फसण्याशिवाय पर्याय नाही
येवढच आपल्या हाती आहे, हसण्याशिवाय पर्याय नाही
आयुष्याच्या पाटीवरच्या सगळ्याच ओळी ख-या नसतात
कितीही आवडो, काही ओळी पुसण्याशिवाय पर्याय नाही
जे काय चाललं आहे त्याने असह्य संताप येतो तरी मन मारून, हात बांधून बसण्याशिवाय पर्याय नाही
माणूस म्हणून जन्मलो खरं, पण माणसं काही दिसत नाहीत
कलेवरांच्या ढिगा-यात आता, घुसण्याशिवाय पर्याय नाही
आलोच नसतो तर कदाचित वेगळं काही घडलं असतं
आलोच आहे तर आता या "असण्या"शिवाय पर्याय नाही
Author Unknown