मी एक नाव आहे, जिला नाही कोणी नावी,
मी एक टाळे आहे, ज्याची हरवली आहे चावी.
मुक्त नाही दिशा कोणती, बंदिस्त असा मी पक्षी,
रंग सारे विस्कटलेले, बेचिराख मी एक नक्षी.
श्वापद ना भेदिले कोणते, असा मी शिकारी,
ऐश्वर्यात जरी लोळतो, तरी समाधानासाठी भिकारी.
बंद दार, बंद खिडक्या, चार उभ्या भिंती,
उजेडाचा ना कवडसा एकही, इथे अंधाराचीच बढती.
खोली माझी खोल किती अन फार मोठा घेर,
सुखाचा ना थेंब एकही, येथे दुखाचेच ढेर.
......अमोल