Author Topic: व्यथा ??  (Read 380 times)

Offline Ashok_rokade24

  • Jr. Member
  • **
  • Posts: 129
व्यथा ??
« on: March 09, 2023, 06:01:03 AM »
दिवस हक्काचे सारे सरले ,
घटकाभर वास्तव्य ऊरले ,
बंदिस्त मुखी झाली वाणी ,
शब्दांना काही मोल न ऊरले ॥

विश्‍वास वाणीत न ऊरला ,
कंप शब्दा शब्दांतून भरला ,
भावना अंतरी अडखळल्या ,
जगण्यात मुकेपण भरले ॥ 

आधाराची काठीही हरवली ,
वाट पावलात घुटमळली ,
श्वास एकांती गुदमरला ,
तेजही नजरेतील सरले ॥

मुठभर वाळू घट्ट जपली ,
न कळत कधी निसटून गेली ,
हृदय रिते मुठही रिकामी ,
वांझोटी भावना नाते तुटले ॥

मुखवट्यांची दुनिया नकली ,
मृगजळास दृष्टी भुलली ,
क्षणभंगुर खेळहा फसवा ,
अशी व्यथा स्वप्न एक भंगले ॥

अशोक मु.रोकडे .
मुंबई. 

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):