"हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
--------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Do I Need A Reason"-"मला काही कारणं हवंय ?"
"मला काही कारणं हवंय ?"
-------------------------
"Do I Need A Reason"
"मला काही कारणं हवंय ?"
-------------------------
आज मी जेव्हा तुला पाहिलं
मला माहितीय, असं हे प्रथमच घडलं
जवळ येताच आपली नजरानजर झाली
आणि मला भासलं ती प्रथमच झाली.
मला माझं भय घालवायचं
त्यासाठी मला तुझी जवळीक हवीय
यापूर्वी मी इतका एकटा कधी नव्हतो
यापूर्वी मी इतका दूर कधी नव्हतो
मला माझं भय घालवायचं
त्यासाठी मला तुझी जवळीक हवीय
आता, खोल खोल पडण्याची मनात भीतीच दाटलीय.
तुला सांगण्यास मला काही कारणं हवंय ?
मी हे गीत तुझ्यासाठीच गातोय
तुला दाखविण्यास मला काही कारणं हवंय ?
मी जिथे आहे, तिथेच राहतोय
थकलो असताना मी झुकत असतो
मी ही जाणीव सतत बाळगतो
आता मी खूपच मजबूत आहे
होय, मी आभारीच आहे.
आज मी त्या शंकांचे निरसन करीत आहे
आज मी त्या भीतीचे निर्मूलन करीत आहे
ज्यांना मी आयुष्यभर सांभाळत आलोय
ज्योतीवर झपटणारा मी एक पतंगा होईन
आणि मी ते प्रथमच करीन.
मला माझं भय घालवायचं
त्यासाठी मला तुझी जवळीक हवीय
यापूर्वी मी इतका एकटा कधी नव्हतो
यापूर्वी मी इतका दूर कधी नव्हतो
मला माझं भय घालवायचं
त्यासाठी मला तुझी जवळीक हवीय
तू हरवशील याचीच मला भीती आहे
माझ्यापासून दूर जाशील याची भीती आहे
आणि अजुनी ती मला वाटत आहे.
--a1
------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
------------------------------------------
-----संकलक आणि अनुवादक
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.03.2023-रविवार.
=========================================