"हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
--------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"A", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Going Down"- "खाली जात आहोत"
"खाली जात आहोत"
-------------------
"Going Down"
"खाली जात आहोत"
------------------
सांभाळून राहा, आपण खाली जात आहोत
तीस सेकंदातच आपण जमिनीवर आपटणार आहोत
प्रवाश्यांचे हसू मावळूनच गेले होते
त्यांच्या शरीराचे तुकडे मैलोनमैल पसरणार होते.
मी भरलेल्या चिखलात गुडघ्यापर्यंत अडकलो होतो
माझं हे दुःख अधिकच वाढणारे होते
माझ्यावर कुठलंच कर्ज नव्हतं, पण पश्चात्तापही नव्हता
माझ्या मनIने ट्रेन पकडण्याचा कुठलाच इशारा दिला नव्हता.
दुसराच दिवस, आणि एक उड्डाण
पण आता खाली जायचा प्रश्नच नव्हता
पण ते पुन्हा घडलं होतं
निरोपाची वेळ जवळ आली होती
मला वाटलं, माझं भानच हरपलं होतं.
मी भरलेल्या चिखलात गुडघ्यापर्यंत अडकलो होतो
माझं हे दुःख अधिकच वाढणारे होते
माझ्यावर कुठलंच कर्ज नव्हतं, पण पश्चात्तापही नव्हता
माझ्या मनIने ट्रेन पकडण्याचा कुठलाच इशारा दिला नव्हता.
प्रत्येकाचा दिवस भरत आला होता
आणि कदाचित माझाही भरत आला होता
पण मी कुठेच जाणार नव्हतो
प्रत्येकाचा दिवस भरत आला होता
मला जाणीव नव्हती तो यारितीने येईल
आणि मी त्या काळजीच्या पलीकडे गेलो होतो.
मी भरलेल्या चिखलात गुडघ्यापर्यंत अडकलो होतो
माझं हे दुःख अधिकच वाढणारे होते
माझ्यावर कुठलंच कर्ज नव्हतं, पण पश्चात्तापही नव्हता
माझ्या मनIने ट्रेन पकडण्याचा कुठलाच इशारा दिला नव्हता.
आम्ही खाली चाललो होतो, आम्ही कुठेच नव्हतो
तुम्हाला त्याची दुसरी बाजू आवडली असती ?
पण आता हे शेवटी संपलं होतं, हा निरोपच होता
मला वाटलं, माझं भानच हरपलं होतं.
मी तिला कळवIयचा प्रयत्न केला
पण ती तिथे नव्हतीच
पूर्वी मी घरी जाताना तिला माझी काळजी असायची
पूर्वी मी घरी जाताना ती माझी वाट पाहायची
मी माझ्या सीटला रेललो, आणि देवाची प्रार्थना करू लागलो
मालवाहू खाडीत ज्याने बॉम्ब ठेवला, त्याचा धिक्कार करू लागलो.
--A
------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-सॉंग लैरिकस.कॉम)
-------------------------------------------
-----संकलक आणि अनुवादक
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.03.2023-सोमवार.
=========================================