मंत्र
सखे तू माझे ऐक तर
थांब थोडा विचार कर
आवडेल त्याच्यावर प्रेम कर
पण जरा जपून कर
सखे तुला म्हणून सांगते
या प्रेमाचे काही खरे नसते
वरून सारे सुंदर वाटते
आतून तसे काहीच नसते
चार दिवस तरंगशील
नंतर जमिनीवर येशील
गोड शब्दांना भुलून जाशील
स्वत:ला हरवुन बसशील
'दिले तुझ्या हाती घर
आता तुला हवे ते कर
हवे तर करीअर कर
मात्र आधी सांभाळ घर '
हे गं कसले स्वातंत्र्य
सांभाळता साऱ्य़ांचे तंत्र
बनून जाशील तू यंत्र
घेऊन ठेव हा मंत्र
प्रेम कर संसार कर
पण स्वत्व राखून कर
समर्पण वगैरे काही खरे नाही
कणाहीन जगणे बरे नाही
— सुलभा
--------------