खेळ ??
********
का नियतीने खेळ हा खेळला ,
डाव असा अधूराच राहीला ,
घेशील का जन्म पुन्हा एकदा ,
नव्याने भेटू नव्या आयुष्याला ॥
भेट तूझी अन माझी पहीली ,
हृदयी खोलवर कोरलेली ,
आलींगनात भान हरपले ,
भय हे ऊद्याचे हवे कशाला ॥
स्वप्नेही किती सोनेरी पाहीली ,
परि सारीअधुरीच राहीली ,
का नियतीने पुन्हा हरविले ,
अजूनही न ऊमजले मला ॥
गुज मनातील मनी राहीले ,
संस्कारात या प्रेम अडकले ,
मार्ग वेगळे , साथही सुटली ,
गर्दीत या जीव गुदमरला ॥
अश्याच एका वळणावरती,
आठवणीच्या त्या विझल्या ज्योती ,
डोळ्यात घेऊन अश्रू दुरून ,
पाहीले सरणावरती तूला ॥
अशोक मु.रोकडे .
मुंबई.