तरीही जगणे आहेच
फुलाचे सुकणे अटल असले
तरी कळीचे उमलणे आहेच
सागराला मिळायचे असले
तरीही नदीचे वाहणे आहेच
पाऊस पाडून संपत असले
तरी ढगांचे दाटणे आहेच
रात्री नभ काजळले असले
तरी सकाळी उजळणे आहेच
जीवन दु:खाने भरले असले
तरीही सुख शोधणे आहेच
मरण कितीही अटल असले
तरीही- जगणे आहेच---!
--सुलभा
------------