मनात माझ्या, प्रश्न दोन
कुणाचा मी, अन माझं कोण?
मनात कोडं, कोड्यात मन
मनाच कोडं, सोडवणार तरी कोण?
मनात आठवणी, श्वासात आठवणी
आठवणी शिवाय, जगताय तरी कोण ?
पण.. त्याच आठवणी, तेच जगण
नवीन आठवणीना शोधतंय तरी कोण?
मनात भावना, गडद भावना
मनातील भावनांना, समजतंय तरी कोण ?
त्यासाठी असावी, अस्तित्वाची जाणीव
पण... माझ्या अस्तित्वाची जाणीव, करताय तरी कोण ?
माझ्या मनातल्या माणसात राहूनही
सापडतोय मलाच मी...
माझं अस्तित्व, मलाच दाखवायचय
न दाखवता, ते समजतंय तरी कोण ?
मनातल्या मनात झुरत घालवायचा
दिवसाचा क्षण...
अन पाणावलेल्या डोळ्यांनी , जागत काढायचा
रात्रीचा क्षण...
मोठ-मोठ्या दु:खातही शोधायचा
सुखाचा क्षण...
अन मनातल्या मनातच मानायचा
आनंदाचा क्षण...
असतात बरोबर, सगळेच नेहमी
तरीही बोचतंय, एकटेपण
जगतात सर्व, स्वत:साठीच नेहमी
दुस-यासाठी जगणारं, भेटतंय तरी कोण ?
म्हणूनच शेवटी
मनातल्या मनातच समजून घ्यायचा
आयुष्याचा ' पण '...