नाती----?
भेट घेऊन एखाद्या तासापुरती
भुलून वरच्या रंग-रुपवारती
जोडली जातात जन्माची नाती
वर म्हणावे स्वर्गीच्या लग्नगाठी
कुठला स्वर्ग नि कसल्या गाठी
तडजोडी करूनच संसार टिकती
आयुष्याच्या या उतरणीवरती
मने होऊन जातात ना रिती
रितेपणी जपावीच लागतात ती
आपुलकी नसलेली कोरडी नाती
किती जोपासावीत एका हाती
वैफल्याची जाणीव उरते शेवटी
हवीत कशाला चिकटवलेली नाती
जिवेभावे जपूनही ठरतातच खोटी
मुठीत घट्ट धरून ठेवलेली रेती
कणकण ओघळून मूठ राहते रिती
----------------