घरात माझ्या उजेडाचा थेंब नाही.
आरशात मज स्वताचे प्रतिबिंब नाही.
दिन सरला उरली रात,
हुरहूर वाढे काळजात,
काळे भोर ढग अपार, प्रकाशाचा टिंब नाही.
मी दूर चाललो या साऱ्यातून,
होईन दूर या पसाऱ्यातून,
कळते त्यांना जरी हे, तरी म्हणत मज कुणी थांब नाही.
काल सोडून आलो किनारा,
मार्ग खुणावे पुढे धावणारा,
थकलो पडलो तरीही वाटे, क्षितीज अजून लांब नाही.
आधार कुणाला नकोच माझा,
मला हि न उरला आधार कुणाचा,
स्वप्नांना देईल आधार,जवळी कुठेच तो खांब नाही.
उदास अर्थ शब्दात माझ्या,
निराश भाव ओळीत जागा,
आसू डोळ्यात कितीतरी,पण एकही ओलाचिंब नाही.
.....अमोल