Author Topic: दोष कोणा देऊ मी ?  (Read 1644 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...
दोष कोणा देऊ मी ?
« on: November 18, 2010, 05:55:10 PM »
दोष  कोणा  देऊ  मी ?

प्रयत्नांती  यश  नाही.
कोणास  त्याची  खंत  नाही.
कुणाकडे आशेने   पाहू  मी?
दोष  कोणा  देऊ  मी ?

कशासाठी  जगत  रहावे.
मरणाशी  आता  लगट  करावे.
पण  विष  घेऊन  रोष कुणाचा का  घेऊ  मी.
दोष  कोणा  देऊ  मी ?

जीवन  आहे  दुष्ट  साले.
यश  नाही  पण  कष्टच  सगळे.
कुठवर  हे  साहू  मी.
दोष  कोणा  देऊ  मी ?

तुजकडे  आता  एकच  मागणे.
हरिमय  करावे  माझे  जगणे.
तुझे  नामच  सदा  गाईन मी.
  दोष  ना  कोणास  देईन मी.


कवी : बाळासाहेब तानवडे

©बाळासाहेब तानवडे १८/११/२०१०

http://marathikavitablt.blogspot.com/
« Last Edit: December 10, 2010, 06:39:55 PM by बाळासाहेब तानवडे »

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):