Author Topic: तो  (Read 1193 times)

Offline mrudugandha

 • Newbie
 • *
 • Posts: 10
तो
« on: December 18, 2010, 06:26:19 PM »

पिंजारलेले त्याचे केस, वय असेल बारा-तेरा
मळकटलेली विजार, शर्ट अर्धा फाटलेला
उभा होता तो एकटाच, त्या समुद्रकिनारी
लाटा येऊन आदळत होत्या, त्याच्या पायाशी
समुद्रवरून नजर मात्र, हलत नव्हती त्याची,
हातात होती शंख-शिंपल्यांनी भरलेली पिशवी.
येणाऱ्या-जाणाऱ्याना तो वेडसरच वाटला,
मला मात्र तो अगदी वेगळाच भासला!
अचानक मोठ्याने तो बोलायला लागला,
समुद्रही त्याचे शांतपणे ऐकायला लागला.
“किती वाईट आहेस तु, का रागावला होता
का असा वागलास तु, माझ्याबरोबर दुष्टा?
वडील, भाऊ-बहीण कोणीच नव्हतं मला,
माऊलीनंच त्या वाढवलं होतं रे मला!
त्या तिथं पलीकडे, होतं आमचे झोपडं
राहायचो तिथं आम्ही, अनाथ मायलेकरं
त्या काळ्या रात्री तु, सैतान बनुन आलास
माझ्या डोळ्यासमोर आईला, आत घेऊन गेलास
ओरडलो, किंचाळलो, किती मारल्या होत्या मी हाका
शेजारच्या काकांनी धरलं. आणि सोडलं नाही मला
 हे घे तुझे शंख-शिंपले, नकोत ते आता मला,
कुठंय माझी आई?, चल, परत दे ती मला !
अनाथच होतो ना मी, का परत अनाथ केलेस?
डोक्यावरचं प्रेमाचं छप्परही, तु वाहुन नेलस!
मित्र ना तु माझा, मला किती आवडायचा!
का रे मग असा तुच विश्वाचसघात केलास?
गुन्हेगार आहेस तु, अपराधी आहेस माझा
तुझ्यावर मी कधीच करणार नाही दया!
पाय धरलेस माझे जरी, तु हजारो वेळा
तुला करूच शकत नाही, मी कधी क्षमा!
एवढे बोलुन तो मागे, सुसाट धावत सुटला,
निळ्या समुद्राचा चेहरा शरमेने काळवंडला!
सुर्यास्त झाला होता, मी कॅमेऱ्याने टिपला
समुद्राचा रंग मला जास्तच लालसर वाटला!
आजकाल तो मला नेहमीच दिसतो
पोटा-पाण्यासाठी नारळपाणी विकतो!
चेहऱ्यावर त्याच्या कसलाच भाव नसतो,
समुद्राकडे मात्र तो पाठ फिरवुन उभा असतो.!
mrudugadha :)
« Last Edit: December 26, 2010, 10:16:38 AM by mrudugandha »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline uday_late

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: तो
« Reply #1 on: December 19, 2010, 04:57:14 PM »
cahn lihal aahy

Offline ghodekarbharati

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
Re: तो
« Reply #2 on: December 20, 2010, 05:56:05 PM »
khup sunder.

Offline Omkarpb

 • Newbie
 • *
 • Posts: 42
 • Gender: Male
Re: तो
« Reply #3 on: December 22, 2010, 07:44:25 PM »
Pharach Chhan !!!!!!!!
khup avadali..........

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: तो
« Reply #4 on: December 23, 2010, 10:24:35 AM »
Khupach aavadali kavita!!

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: तो
« Reply #5 on: December 23, 2010, 10:50:44 AM »
chhan ahe kavita avadali ......... hi tuzi svatachi kavita ahe ka? ........ kavite khali kaviche nav ka nahi dile ahe ?

Offline mrudugandha

 • Newbie
 • *
 • Posts: 10
Re: तो
« Reply #6 on: December 26, 2010, 10:23:24 AM »
धन्यवाद सगळ्यांचे!