असते मी एकटी,
एका शांत संध्याकाळी,
पाहताना आकाशही,
कोर पाहताना चंद्राची,
घराच्या तुळशी पाशी,असते मी एकटी...........
असते मी एकटी,
चिंब पावसात भिजतानाही,
थवा पक्षांचा पाहतानाही,
चित्रात रंग भरतानाही,
छानसं गाणं ऐकतानाही,असते मी एकटी...........
असते मी एकटी,
जेव्हा लिहिते कविता मी,
लोकांच्या गर्दीतही,
नदी काठी बसूनही,
इंद्रधनू पाहतानाही ,असते मी एकटी.............
असते मी एकटी,
जीवनाचा एखाद्या वळणावरही,
आयुष्याच स्वप्न रंगवतानाह,
आस घेऊन सोबतीची,
पाहत वाट कुणाची तरी,असते मी एकटी.........
असते मी एकटी,……… असते मी एकटी,……………..
Nivedita Indulkar