दुहितेची व्यथा
दोन्ही घरांचे हित साधणारी ती दुहिता
क्षणकालची पत्नी, अनंतकालची माता
असे जिला गौरविता, तिचीच ही कथा
पर-सुखासाठी झटणाऱ्या नारीची व्यथा
पित्याघरी साऱ्यांच्या हितासाठी झटली
परक्याचे धन म्हणत म्हणतच मोठी झाली
स्वत:च्या घराचे-साजणाचे स्वप्न पाहू लागली
स्वप्नीच्या राजकुमाराची राणी पण झाली
पण राणीपणही तिचे स्वप्नवतच होते
गृहिणी असली तरी तेही घर तिचे नव्हते
अजून ही दुहिता आहे स्वत:च्या घराच्या शोधात
लाभेल का तिला हक्काचे घर काळाच्या ओघात ?
---------------