प्रेमाचा मायेचा वर्षाव करणारं आभाळ
मनात प्रेमाचे बी पेरणारं आभाळ
कधी विजेच्या कडकडाटाने रागवणारं
तर कधी रखरखत्या उन्हात छाया देणारं
तो गार वारा मनाला शांत करून जाणारा,
पावसाचा एक थेंब मनाला स्फुर्ती देणारा!
दाटून येते आभाळ जेव्हा,
मायेची तृषा मिटते तेव्हा.
सारं कळतं मनातलं या आभाळाला
देऊन जातो दिशा माझ्या जीवनाला
माझ्यापासून आहे ते लांब किती,
तरीही उमगते त्याला मनातील भीती!
आभाळाची मी पाहात असतो वाट,
चालतं ते माझ्या जीवनाची वाट
प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा
म्हणते मला, "आहे मि सोबत माझ्या बाळा"
आभाळ "माया" करतं माझ्यावर
ममतेचं ते प्रतिक जगा "वर"