हृदयी आभाळ दाटलेले अन भावना उरी,
न विसरले शब्द विसरली न साथ परि,
अडवली वाट, दिली जीवाची आन तरी,
वाहिला नात्याचा आधार कशी ही दुनियादारी...
जळाला कण कण तुझा क्रोधाच्या अंगारी,
आठवून पहा नात्याची सकाळ हसरी..
झळाळणारे तेज आपल्या मनाच्या अंबरी,
तुटणारा तिळ तिळ रे तुला हाक मारी...
स्वार्थापायी सर्व विसरले रक्तच झाले वैरी,
अश्रूंच्या डोहात नाती भिजून गेली सारी,
कठपुतळ्यांच्या खेळात तुझ्या,तुटली बंधनाची दोरी,
फाटली संस्काराची झोळी...देवा!! तूच अमुचा कैवारी....
- नूतन घाटगे
http://nutanghatge.blogspot.com