बदल
गेल्या काही वर्षात किती बदल झाला
राम कृष्ण जाऊन harry potter आला
शाळेमध्ये पूर्वी लिहायचे पत्र
सुरु झाले आता sms चे सत्र
विट्टीदांडू आट्यापाट्या गायब झाले कुठे
जिकडे तिकडे NFS ची गाडी सुसाट सुटे
सुट्टीमध्ये मामाच्या गावाला जायचे
कोकणातील आंबे फणस आवडीने खायचे
आता सुट्ट्यांमध्ये चालू होतात summer class
pizza burger शिवाय काही वाटत नाही झकास
आजी आजोबा काका काकू किती करायचे लाड
आता मात्र घरात फक्त असतात mom dad
शाळेमध्ये पोरांपेक्षा दप्तर दिसते मोठे
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पोपटपंची घोटे
parents ना आपला पोरगा हवा नंबर एक
छोट्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा अनेक
अपेक्षांच्या ओझ्याखाली सरून जाते बालपण
वापस काही येत नाही गेलेला काळ पण
-स्वप्नील वायचळ