मन मांडते खेळ, त्यात त्याचेच नियम!
चुकुन हरते कधी , पण जिंकते कायम!
मनच रुसते, मनच मनवते!
मनाच्या वेडेपणाला, मनच हसते
मन करते तक्रार, मनच फिर्यादी!
चुक नाही माझी, पण मीच आरोपी!
मनच समजावते, तेच न्याय करते!
आनंदी राहण्याची शिक्षा सुनावते!
मन कधी रडते, आसुही तेच पुसते!
हसऱ्या गालावर दुखाःची खळी पडते!
मन स्वच्छंदी, मन लहरी!
मन मिणमिणणारी पणती!
मन सुरेल, मन सुरेख!
मन झरझर वाहणारी नदी!
मन दिसते कसे?
मन असते कसे?
हे नेहमीच बिचारे फसते कसे?
मनाच्या प्रश्नांना, द्यावे उत्तर मनानेच!
उलगडा होऊपर्यत, जगावे मुक्त मनाने!
mrudugandha