सोहळा
कुणा दारी असो
फुलांची आरास
अंगणी तुळस असो माझ्या
दिव्यांचा उत्सव
असो कुणाठायी
देव्हारी समई तेवो माझ्या
कुणा मिळो प्रभू
मधुर पक्वान्न
सात्त्विक भोजन पुरे मला
संगीत श्रीमंत
कुणास मोहवी
अभंग नि ओवी माझी मला
धनाने भरली
कुणाची शिदोरी
माझ्या उरी हरी साठलासे
उरी समाधान
दिलेस दयाळा
जन्माचा सोहळा पवित्रसा!
---------
दत्ता हलसगीकर, सोलापूर.
( किस्त्रीम दिवाळी,२०१०)