पाऊस पाहत राह्ण्याची मजा
पावसात भिजणार्यांना कधी कळणारच नाही
घट्ट मिटलेल्या डोळ्यांत जपलेला अश्रू
गालांवर कधी ओघळणारच नाही
काल घडलेल्या सार्या गोष्टी
आज उगीच आठवत राह्तात
डोळयांनी वाट करून दिली तरी
उगीच पाणी साठवत राहतात
पुसून टाकावी, वाटतं, करावी
पुन्हा कोरी करकरीत पाटी
पण मनाची खळगी पोकळ
अन् आठवणींची पेंसिलही खोटी
आता मनाला सवय झली आहे
रोज ग म भ न गिरवायची
स्वत:ची फोल फुशारकी
स्वतःसमोरच मिरवायची
यंदाच्या पावसाळ्यात, वाटलं होतं
पाटीवरची अक्षरे पुसली जातील
पण बहुदा पावसाला वाटलं असेल
पाटीमुळे आपले शुभ्र थेंब काळे होतील