Author Topic: दिवसा स्वप्ने बघतो मी...  (Read 1362 times)

Offline marathi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 212
दिवसा स्वप्ने बघतो मी...
« on: January 24, 2009, 11:17:04 AM »
अजब 
दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री जागत बसतो मी...
उगाच कविता करतो मी
जगात वेडा ठरतो मी...

मनात इमले रचतो मी
आशेवरती जगतो मी...

असतो तेथे नसतो मी
मलाच शोधत बसतो मी...

वरवर नुसते हसतो मी
'अजब' मनाशी कुढतो मी...

Taken From मनोगत


Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: दिवसा स्वप्ने बघतो मी...
« Reply #1 on: December 22, 2009, 10:17:39 PM »
अगदी माझ्या मनातले  :(