वाटेवर पुढे जाताना
अंधाराचा प्रकाश मला वाट दाखवत होता
पुढे खूप काही अहे, सांगत होता.
वारा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता
पानांची सळसळ, गारव्याची कळकळ खुणावत होती मला.
सुकलेल्या नदीचे पाणी कण्हत होते, हुंकार देत होते,
म्हणत होते, "मला तहान लागली अहे, पाणी द्या"
चंद्र त्याचे डाग, ढगांच्यामागे लपवण्याचा प्रयत्न करत होता.
चांदण्यांच्या कुत्सित हसण्यावर मनातल्या मनात रडत होता.
निरव शांततेचा आवाज कानात भरून राहिला होता.
दुरून येणारे पक्षांचे स्वर मनाला भेदून जात होते.
पण आता मला वाट दाखवणारी तमाची ज्योत सरत चालली होती.
आणि ती वाट धूसर होत आसमंतात विरत चालली होती.