Author Topic: कुणी घेणार का? देश विकायचाय  (Read 1399 times)

Offline chetan (टाकाऊ)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 86
 • Gender: Male
हागला अजीर्ण होऊन, तरी, इथं सलाम घडला
उपाशी आसवांत भिजून, गहू तांदूळ सडला
कच्चा माल तयार आहे, सोमरस गाळायचाय
कुणी घेणार का? माल विकायचाय   
अहो कुणी घेणार का? देशच विकायचाय
वाढता वाढली महागाई, झालंय जिणं हराम
त्यात दशानन रावण बोले. म्हणा जय श्रीराम
दशमुखांनी हासत वदला,येता? बिभीषण ठेचायचाय
विटांना सोनं कमी पडतंय, त्याचा वाडा लुटायचाय 
अहो कुणी घेणार का? देशच विकायचाय   
स्थलांतरित परदेशी, इथलेच होऊन राहिलेत
आणि सख्ख्या भावांना, परके म्हणून राहिलेत
अंध देवतेच्या तराजूत, अन्याय तोलायचाय
तोललेला शिळा अन्याय, ताजा म्हणून विकायचाय     
अहो कुणी घेणार का? देशच विकायचाय
देश ठेवा लुटणारे, बहाद्दर म्हणून सुटले
देश सेवा करणारे मात्र, हाती डोकी फुटले
अंध देवतेच्या कुरणात, कळप चारायचाय
सत्य रुचलं नाही म्हणून, पुतळा कापायचाय 
जिला मानत नाही तीवर सुद्धा हात ठेऊन सांगतो,
असंच पटलं नाही तर उद्या देशही विकायचाय
- मकरंद केतकर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
apratim