ॐ साईं
“जीवघेणा घटस्फोट”
अग्नी साक्षीने जिथे,घेतात सात फेरे,
प्रवासू म्हणून,आयुष्याचे संपूर्ण घेरे;
नाही पटलं तर,दुरावतात दाखवून आरोपित बोट,
मरणापेक्षाही भयंकर,हा जीवघेणा घटस्फोट…!
पुढल्या जीवनाचा जणू, विचारच नाही,
प्रखरीत रागापुढे जसे,अंधःकारित सर्व काही;
कसा झेलतात हा,अग्नीत एकटेपणाचा लोट,
मरणापेक्षाही भयंकर,हा जीवघेणा घटस्फोट…!
कसा विसरतात तो क्षण,जो एकुन विलोपतात,
सर्व राग लोभ सहनून,जोडीने जपतात,
कशी विकोपाला जातात,शोधून एकमेकात खोट,
मरणापेक्षाही भयंकर,हा जीवघेणा घटस्फोट…!
आज अश्रू गाळतात डोळे, तोंडी असते ओरड,
नंतर काय जेव्हा गाली, खारटेल अश्रूंची कोरड;
आज रसाळ असलेले,उद्या खपलीत होतील ओठ,
मरणापेक्षाही भयंकर,हा जीवघेणा घटस्फोट…!
लोक तर हसतील,दाखवून प्रेम उसनं,
उद्या तेच विचारतील,बोचरे खोचक प्रश्न,
त्यांना न काही फायदा,न कसलीच तोट,
मरणापेक्षाही भयंकर,हा जीवघेणा घटस्फोट…!
लोभाने हातावलेले गाल,प्रेमाच्या त्या लोभस हरकती,
उद्या काय जर कोणीच नसणार,मोजायला गाली सुरकुती;
का ओढवतात लाथ नियतीची,उघडवून स्वतःचेच पोट,
मरणापेक्षाही भयंकर,हा जीवघेणा घटस्फोट…!
इतक का खरंच,आयुष्य आहे स्वस्त,
ज्याला कसलेच मोल नाही,कि करतात त्याचा अस्त;
कसे जीवन मोजतात,शपथावून पोटगीरूपी नोट,
मरणापेक्षाही भयंकर,हा जीवघेणा घटस्फोट…!
कोण लक्षात ठेवणार,किराणा-विज,बिलाची तारीख,
कोण सांत्वानायला राहणार,आजार-साजार बारीक,
न कोणी येणारा,न जाणारा,ना कोणाचेच कसले गालबोट,
मरणापेक्षाही भयंकर,हा जीवघेणा घटस्फोट.
दुरावल्या मनी आज जी,आहे जखम ओली,
पिडवून उठणार नक्कीच उद्या,जिथवर तिची खोली;
कोणता हाथ पुढावणार,लावायला थंड मल्मित बोट,
मरणापेक्षाही भयंकर,हा जीवघेणा घटस्फोट...!
कसा कळणार दोघातला,एक कधी अन्तावला,
विधवा कि विदुर,कोणाचा श्वास शांतावला,
शून्यात असेल नजर,जरी हृदयी हुंदक्याचा विस्फोट,
मरणापेक्षाही भयंकर,हा जीवघेणा घटस्फोट…!
चारुदत्त अघोर(२/३/११)