मित्र
मित्र असावा माझ्या त्या जिवलग एकाच मित्रासारखा
विश्वास ठेवला ज्याने मजवरी आंधळ्यासारखा ........
मी होतो जसा तसा त्यानेच प्रेमाणे जवळ केला
स्वत: समोर कधीही मला कमी नाही लेखला........
प्रेमानेही त्याने कधी मला एक सल्ला नाही दिला
बुद्धीवर तल्लक माझ्या नेहमीच विश्वास ठेवला ....
स्वत :सही मी नाही जाणत तितका त्यान मज जाणला
जिवनात फक्त माझ्या मी त्यालाच मित्र मानला ...
व्याख्येत मित्राच्या तर तो माझ्या सदा एकटाच बसला
तोच हृदयावर माझ्या अधिराज्य गाजवत राहिला ........
कवी
निलेश बामणे