ती...
ती कोण आहे,काय आहे
हा मुद्दा तसाही थोडासा गौणच...
महत्वाच ती कशी आहे..
पण मन वगैरे मात्र जरा स्तोमच..
म्हणजे...
ती वागायला,बोलायला कशी आहे
ते सोडा हो...
अहो! ती दिसते कशी? हा खरा मुद्दा...
तिन सुंदरच दिसायला हव...
कारण..कारण ती स्त्री आहे...
तिची ओळखच तीच स्त्री असणे आहे...
....पण त्याला कुठे आहेत अशा काही अटी??
कारण तो पुरुष आहे न..
त्यान हुशार असाव,कर्तुत्वान झळकाव...
इतकीच माफक अपेक्षा त्याच्याकडून !!!
आणि तीही पूर्ण नाही झाली
तरीही काही हरकत नाही...
...कारण त्याच पुरुष असणंच
जन्मतः मिळालेलं जणू यशच त्याचं !!!
....पण तीही तळपतेय तेजानं
झळाळतेय तिच्या कर्तुत्वान..
तिच्याकडेही धाडस आहे
परिस्थितीला नमवण्याची ताकत आहे...
महत्वाकांक्षा,जिद्द,चिकाटी हे सार तिच्याकडेही आहे...
....तरीही...तरीही तीच दिसणचं का महत्वाचं??
त्याच्यावर कुठे आहेत बंधन
मदनाचा पुतळा असण्याचं?
मग तिच्याकडूनच का रती असण्याची अपेक्षा??
तिच्या असण्याचं काहीच मोल नाही??
...आज गरज आहे
कुणी तिला ओळखण्याची
तिला माणूस म्हणून जाणून घेण्याची...
तिच्या अंतरीच्या सौंदर्याला जवळून पाहण्याची...
...कधी मिळेल तिला विश्व एक असं तीच
जिथे... जिथे..आरसे नाहीत ठरवणार रंगरूप माणसाचं......
नमस्कार मंडळी... जागतिक माहिलादिनाच्या निमित्याने पोस्ट करायची होती... पण नाही जमू शकलं..असो...चू भू दे घे....
धन्यवाद
Honey ....