Author Topic: कोलाज कळ उत्तरकविता  (Read 874 times)

Offline phatak.sujit

  • Newbie
  • *
  • Posts: 13
कोलाज कळ उत्तरकविता
« on: March 17, 2011, 08:53:39 PM »
दु:खानंतर नेहमीच्या ओळी स्मरतात
मग वेगळं दु:ख घोंघावतं
स्वत:चं दान मागतं
मानगुटीवर बसतं कवितांचं भूत
टाच मारून कागदभर पळवतं
कोण दमतं? कोण मजा मारतं?
 
नक्की ऋतू कोणता
रंग कोणते
स्वर कोणते
शब्द कोणते
विचार कोणते
भावना कोणत्या
स्पर्श कोणते
गंध कोणते
दृश्य कोणते
जगण्यावरून वाहात गेलेले लोक कोणते
कोण उरलं
उरलं ते कोण आहे
 
शहरभरचं रमणं
आणि घरातलं एकाकीपण.
 
-सुजीत

Marathi Kavita : मराठी कविता