एक प्राजक्ताचं फूल झाडावरून गळलं
मी त्याला पाहिलं हे त्याला नाही कळलं
त्याला लागलं असेल म्हणून मी त्याला पुसणार होते
पण ते एकटेच आपले दु:ख सोसणार होते
काहीच न बोलता बिचारे आतल्या आत कुढत होते
दु:खाच्या सागरात एकटेच बुडत होते
ते फुल वाऱ्याबरोबर निघून गेलं
पण माझ्या मनाला मात्र त्याचं न बोलणं ही लागून गेलं
-गोजिरी