ते विझले तारे, अंधारातून चमचमनारे,
ते विझले तारे, काळोखातून मंद हसणारे,
रात्रीच्या या म्लान मुखावर कसली ही ग्लानी,
चंद्र हा एकाकी उभा शोधत आपुली चांदणी,
काळोखाला भेदत होता एकाकी झुंज़ टोकाची,
ना संगतिला उभे कुणी, ना मदत भेटी कुणाची,
हळहळत बापुडा मार्ग आपला तुडवत चालला,
अफाट,अनंत रस्ता पुढती,थांबा थेट क्षितीजाला,
रात्र हळूच त्यास छेडि,का खिन्न असा तू मुला,
काळोखाचा मुसाफिर तू,अंधाराला का भ्याला,
थोडकेच आयुष्य यांचे,ढग हे क्षणात विरतील,
पुन्हा अनन्तातुन तारे सारे हा आसमंत फुलवतील....