ह्या जगात आलोय
जगावं तर लागेलच
हा विषाचा प्याला घेतला आहे
चाखावा तर लागेलच
कितीही धडपडलो अडखळलो
...पुढे तर जावे लागेलच
आयुष्याच्या निखाऱ्यात
जळावे तर लागेलच
परीक्षा घेणाऱ्या त्या देवाला
एकदा तरी विचारावे लागेलच
दिले दु:ख त्यानेच मजला
सुखही द्यावे त्याला लागेलच
कविता बोडस