Author Topic: देवाचा हि देव  (Read 1796 times)

देवाचा हि देव
« on: May 07, 2011, 01:46:33 PM »
देवाचा हि देव

जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा तेव्हा आई आठवते
कारण देवा आधीही मदतीसाठी हाक आपण आधी आईलाच मारतो
कितीही मोठे झालो आणि लांब आलो तरी घरची आठवण येतेच
आयुष्यात कधी नव्हे तेव्हा mothers day चे महत्व कळून येते

आजही आठवते जेव्हा जेव्हा काही चूक केली
आईने तेव्हा तेव्हा ती  पकडली
आणि विचारले जेव्हा तेव्हा मात्र उत्तर मी नाहीच दिले
पण डोळ्यातील उत्तर मात्र तिनेच ओळखले

बाबांसमोर आमची बाजू आईनेच घेतली
परत आता करणार नाहीस याचे वचन तिने नेहमी घेतले
आज ते सर्व आठवते कारण पडतो मी एकटा इकडे
आहेत मित्र भरपूर पण वाटते पडते काही कमी इकडे

आमच्यासाठी आजपर्यंत किती त्याग केला तिने
आज जेव्हा जाणीव होते तेव्हा वाटते दुर्लक्ष्य आम्ही केले कसे
जाऊदे झाले ते आता मात्र ठरवले इथून आपण सुधारायचे
आता आईच्या सावलीतच उरलेले  हे जीवन जगायचे

कधी कधी वाटते देवहि करत असेल आपला हेवा
कारण जेव्हा जेव्हा अडकतो तो संकटात आठवतो तो कोणाला?
त्याला वाटत असावे मीच बनवली आई पण प्रेम मात्र मला लाभले नाही
म्हणून की हे अनुभवण्यासाठी तो मनुष्यरूपी जन्म तर घेत नाही?
[/left][/left][/center]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline paragakluj

  • Newbie
  • *
  • Posts: 3
Re: देवाचा हि देव
« Reply #1 on: May 12, 2011, 07:17:17 PM »
Apratim Mitra!!!

Re: देवाचा हि देव
« Reply #2 on: May 19, 2011, 04:35:32 AM »
abhari aahe :)

Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 650
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Re: देवाचा हि देव
« Reply #3 on: May 26, 2011, 09:49:30 AM »
sundar kavita aahe mitra mastach

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):