Author Topic: या झोपडीत माझ्या  (Read 1432 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
या झोपडीत माझ्या
« on: January 24, 2009, 11:19:54 AM »
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ?मज्जाव? शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥
 
संत तुकडोजी महाराज

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dinesh.belsare

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
  • शब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....
Re: या झोपडीत माझ्या
« Reply #1 on: November 09, 2010, 10:39:04 PM »
khup chhan bhajan aahe he... i liked it a lot..