Author Topic: माजघरातील भित्तीचित्रे  (Read 1659 times)

Offline kp.rohit

  • Newbie
  • *
  • Posts: 5उन्हाची तिरीप...
फक्त पावलांपाशीच येऊन अडायची
तिरकस फटीतून उब आजमावताना
अंधार पाठीवर हलकीच थाप मारायचा.
किरणांनाही दिसायचा माजघराचा उंबरठा!!
त्यांनीही कधी तो ओलांडला नाही.

प्राजक्ताचा सडा...
दरवळत रहायचा श्वासात
अंगांग शहारायचं ओल्या सुवासाने
अंधार परत कुजाबुजायचा कानाशी
'फुलांना मज्जाव असतो लाल पातळाचा'
मनाच्या अंगणात तसाच पडायचा सडा

कधीकाळी हा उंबरठा ओलांडताना पाय थरथरले होते.
आता हा उंबरठा ओलांडताना पापणी थरथरते.

-रोहित कुलकर्णी

http://sanjyatrik.blogspot.com/view/flipcard