असेन मी नसेन मी
तरीही मागे उरेन मी
कुणाच्या आठवणीत कुणाच्या शिव्यांत,
कुणाच्या हसण्यात
तर कधी कुणाच्या हसता हसता पाणावलेल्या डोळ्यांत
अश्रू बनून उरेन मी,
असेन मी नसेन मी
आठवणीँचा एक थेँब बणून उरेन मी,
ना उरेल हा देह
ना उरेल काही
उरतील फक्त ही शब्दफूले,
ती वेचून ज्याचे मन मोहरले
तव हास्यात हसेन मी,
असेन मी नसेन मी
तरीही शब्दगंध बनून दरवळेन मी,
असेन मी नसेन मी
तरीही मागे उरेन मी.
-ट्विँकल देशपांडे.