माझे हे असच असत, आधी नाही म्हणायचं आणि दुसऱ्यांना दुखवायचं,
मग स्वतालाच त्रास सहन करून परत त्यांना खुश करण्यासाठी होय म्हणायचं....
सदैव दुसऱ्यांचा विचार करायचं, आपल्याला कितीही ताप झाला तरी चेहरा नेहमी हसरा ठेवायचा प्रयत्न करायचं,
माझे हे असच असायचं....
दुसरे नेहमी म्हणतात तू हा असाच राहणार तुझ्यात कधी बदल नाही होणार, यावर मी फक्त हसायचं,
जरी हसायचं तरी मनात काय आहे हे फक्त माझं मलाच ठाऊक असायचं, पण पुन्हा कोणीतरी नाराज होईल म्हणून गपच बसायचं....
माझे हे असच असायचं....
मी नेहमी दुसऱ्यांसाठी झटतो हेच एक सुखद मोल माहितीत ठेवायचं, काही म्हणो जग आपण हे काम अविरत चालू ठेवायचं,
घरातील काही म्हणोत पहिल्यांदा दुसऱ्यासाठी जगायचं मग घरांच्याचा विचार करायचं,
माझे हे असच असायचं....
दुसऱ्यांना जगवले पण स्वत आणि कुटुंबाकडे लक्ष कुठे दिले हे कधी कधी लक्षात यायचं,
पण कोणीतरी हात सैल सोडायलाच हवेत मग आपण का नाही म्हणून पुन्हा अविरत राबायचं,
हाहा म्हणता आयुष्य असाच सरायचं,
दुसऱ्यासाठी राबता राबता एक दिवस दुसर्यांसाठीच मरायचं,
माझे हे असच चालायचं....