आहे का कोणी
देशातील राज्यकर्त्यांना, एकदा मैदानात उतरवले पाहिजे ,
त्यांच्या आंधळ्या खेळातून, आपणही काही शिकले पाहिजे ,
आंधळेपणातून, त्यांना फक्त आपले जग दिसते ,
मुलांना विदेशात कुठे पाठवायचे, हेच मग सुचते ,
राज्य करता करता, राज्यकर्ते स्वतःचेच राज्य वाढवत आहेत ,
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा, ते बळी देत आहेत ,
आहेत शेतकऱ्यांची पण स्वप्ने, मुलांच्या उच्च शिक्षणाची ,
काबाड - कष्ट करून ,आपले स्वप्न सजवण्याची ,
नाही कोणाचा आधार, तरी ताठ उभे राहण्याची ,
आपल्या कुटुंबाला, दोन सुखाचे घास भरवण्याची ,
आहे बळ ,त्यांचाकडे नैसर्गिक संकटावर मात करण्याचे ,
स्वतः उपाशी, राहून देश जगवण्याचे,
प्रत्येक निवडणुकीच्या आश्वासनाला, शेतकरी बळी पडत आहे ,
सामान्य जनताही, त्यांची आश्वासनच पेलत आहे ,
का ? नेहमी निवडणुकीला आमचाच विश्वास चुकतो ,
चुकलेला विश्वासच, मग आमचा घात करतो ,
सरकारच्या पोकळ आश्वासनांना, शेतकरी बळी पडत आहे
आणि क्षणार्धात स्वप्ने घेऊन, धर्तीवर कोसळत आहे ........
आहे का कोणी

आश्वासने पाळणारे ??
आहे का कोणी

शेतकऱ्यांची हत्या थांबवणारे ??
आहे का कोणी
neeta...